बिग ब्रेकिंग | काल कंटेनर ला आग आज दौंडच्या खडकीत खाजगी बस ला अपघात,एक ठार तर पंधरा ते वीस जण जखमी

Dec 25, 2024 - 11:47
Dec 25, 2024 - 11:51
 0  758
बिग ब्रेकिंग | काल कंटेनर ला आग आज दौंडच्या खडकीत खाजगी बस ला अपघात,एक ठार तर पंधरा ते वीस जण जखमी

आय मिरर

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसचा पुढील ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात बुधवार दि.२५ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी जवळील विसावा हॉटेल नजीक झाला आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने यातील मृत व जखमींची नावे समजलेली नाहीत. हा अपघात नेमका कशामुळे व कसा झाला हेही पुढे आले नाही मात्र ट्रकला लक्झरी बसची पाठीमागून धडक बसल्याचे प्राथमिक दिसत आहे.यातील जखमींना केतन वाघ यांच्या रुग्नवाहिकेतून भिगवण येथील खाजगी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काल कंटेनर ला आग आज बसचा अपघात…

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे.मंगळवारी 24 डिसेंबर रोजी पहाटे एसी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग लागली.यामध्ये ट्रक मधील क्लीनर कोरफळून मृत पावला. तोच आज पहाटे खाजगी बस आणि ट्रकचा अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला तर पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow