बिग ब्रेकिंग | दौंडच्या कुरकुंभ मधील अल्काईल अमाईन्स केमिकल्स कंपनीत भीषण स्फोट,एक गंभीर

आय मिरर
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट झालाय.आज शनिवारी पहाटेच्या सुमारस ही घटना घडली आहे. डिस्टिलेशन रेसिडेंट प्रेशर जास्त झाल्यामुळे तो टँक फुटला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेत एक कामगार गंभीरपणे भाजलेला आहे. आणखी किती कामगार भाजलेले आहेत, यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
जो व्यक्ती भाजला आहे त्याला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.सागर प्रल्हाद रणभावरे वय २३ वर्षे रा. नेवासा, जि.अहिल्यानगर असे भाजलेल्या कामगाराचे नाव आहे.
घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, सुरक्षा अधिकारी अकुंश खराडे, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी भेट दिली आहे.
What's Your Reaction?






