Indapur गनिमी काव्याने स्थापन झाला इंदापुरात छत्रपती संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा

आय मिरर
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूर मध्ये आय कॉलेजच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेय.शंभू भक्तांनी गनिमी कावा करत या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली आहे. प्रशांत मामा उंबरे युवा मंचच्या वतीने या ठिकाणी हा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.
सोमवारच्या मध्यरात्री प्रशासनाला कोणतीही खबर न लागू देता, अतिशय चातुर्याने शंभू भक्तांनी या ठिकाणी हा पुतळा स्थापन केला. त्यानंतर या ठिकाणी एका शामियान्याच्या स्वरूप देण्यात आलं आणि आज मंगळवारी 13 मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास या शामियान्याच्या आत मध्ये झाकलेल्या या शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शेकडो शंभू भक्तांनी स्वतः केलं आहे
इंदापूर ही ऐतिहासिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा हा पूर्ण कृती पुतळा स्थापन करण्यात आल्यानं शंभू भक्तांमध्ये देखील आता समाधानाचे वातावरण आहे.
What's Your Reaction?






