इंदापुरात दहावीच्या निकालात लाखेवाडीच्या जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचा डंका, विद्यालयाच्या दोघी तालुक्यातून पहिल्या

आय मिरर
इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला असून यात पुण्याच्या इंदापूर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने मिळवला आहे. ९८ टक्के गुण मिळवून ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते व मृण्मयी अतुल शिंदे या दोन्ही विद्यार्थिनी इंदापूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तालुकाभर त्यांच्यावर पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत असून संस्थेच देखील कौतुक होत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातून प्रथम दोन क्रमांक हे लाखेवाडीच्या जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मधील विद्यार्थ्यांनीच पटकवले आहेत.
सलग पाच वर्षे ही संस्था 100 टक्के निकालात यशस्वी ठरली असून माजी जिल्हा परिषद सदस्य आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले हे विद्यार्थ्यांच्या प्रती घेत असलेल्या मेहनतीचे उचित फळ या संस्थेला मिळताना दिसत आहे.
ज्ञानेश्वरी नाथजी मोहिते या विद्यार्थिनीने इंदापूर तालुक्यात प्रथम येत गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार,जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा 2025 इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 100 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 100 विद्यार्थी पात्र झाले. म्हणजेच विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला.100 विद्यार्थ्यांपैकी 88 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीने पास झाले आहेत.
गुनानुक्रमे निकाल खालील प्रमाणे :
1) मोहिते ज्ञानेश्वरी नाथाजी 490/500 98.00%
1) शिंदे मृण्मयी अतुल 490/500 98.00%
2) जाधव श्रावण अनिल 488/500 97.60%
यासोबतच याच विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या
3) जाधव दुर्वा दादासाहेब 483/500 96.60%
4) ढोले प्रतीक्षा शशिकांत 481/500 96.20%
5) ढोले संस्कृती नवनाथ 480/500 96.00%
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे सहसचिव पौर्णिमा खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्तपृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर,मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन केले.
What's Your Reaction?






