इंदापूरच्या लाखेवाडीत आजपासून मल्हार महोत्सवाला सुरुवात ! शनिवारी मंत्री भरणेंची उपस्थिती

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल जय भवानीगड विकास प्रतिष्ठान कडून आयोजित केलेल्या मल्हार महोत्सव 2025 ला आजपासून प्रारंभ होत आहे. दिनांक 9 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत हा महोत्सव साजरा केला जाणार असून यामध्ये शालेय विद्यार्थी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.
दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, सिने अभिनेता धनंजय जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या शुभहस्ते या सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले आणि इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता क्रिडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक विभाग आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे आणि पर्यावरण, वन, पोर्ट व कृषी दादरा नगर हवेली व दमन दीव चे सचिव सागर डोईफोडे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास नवी मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक सुहास चौरे, सहाय्यक वनरक्षक विक्रांत खाडे यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले आणि संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे यांनी केले आहे.
What's Your Reaction?






