निमसाखरमध्ये दिव्यांग असणाऱ्या गणेश धनवडेंचा उपोषणात सहभाग, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील निमसाखर मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. यात दिव्यांग असणाऱ्या गणेश धनवडे यानेही सहभाग नोंदवत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.त्याच्या या कृतीचं मराठा समाज बांधवांकडून कौतुक होतेयं.
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. निमसाखर गावांमध्ये ही राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. निमसाखर मध्ये समाज बांधव एकत्र येत साखळी उपोषण करत आहेत. या साखळी उपोषणामध्ये दिव्यांग असणारे गणेश धनवडे देखील सहभागी झाले आहेत.
What's Your Reaction?