जागतिक परिचारिका दिनी इंदापुरात जय इन्स्टिट्यूट मध्ये मेळघाटातील आदिवासी विद्यार्थिनींचा सन्मान

आय मिरर
पुण्याच्या इंदापूरात जय इन्स्टिट्यूट मध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी मेळघाटातील आदिवासी विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष जयवंत नायकुडे आणि सचिव लता नायकुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर त्यांना परिचारिका व्रताची शपथ देखील देण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे धरमचंद लोढा, माजी नगरसेवक प्रशांत शिताप, अस्लम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर शहरात 2008 पासून जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग हे कॉलेज श्री जयवंत नायकुडे यांच्या माध्यमातून चालवल जात. या कॉलेजात प्रामुख्याने मेळघाटातील आदिवासी मुली नर्सिंग क्षेत्राचे प्रशिक्षण घेतात. या कॉलेजात प्रामुख्याने जीएनएम आणि एन एम ए कोर्सेस चालवले जातात.
2019 च्या कोरोना जन्य परिस्थितीमध्ये याच कॉलेजमधील शेकडो विद्यार्थिनींनी आपला जीव धोक्यात घालत सामाजिक काम म्हणून डॉक्टरांच्या मदतीने त्या मैदानात उतरल्या होत्या. या विद्यार्थिनींच्या माध्यमातून जयवंत नायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी त्यांच्या शरीराचे तापमान मोजणी करण्याचं मोठं काम त्या कठीण काळात या विद्यार्थिनींनी केलं होतं. त्यांच्या या कार्याचा इंदापूरकरांनी देखील गौरव केला होता.
विशेष करून मेळघाटातील आदिवासी मुलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यात जयवंत नायकुडे यांचा मोलाचा वाटा आहे. आजपर्यंत या कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आदिवासी भागातील अनेक मुली स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या आहेत. खाजगी क्षेत्रात यासोबत शासकीय क्षेत्रात त्या नोकरी करत आहेत. याचा सार्थ अभिमान मेळघाटातील आदिवासींना आहे.
प्रत्येक वर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये जयवंत नायकुडे हे स्वतः मेळघाटात जातात, आदिवासींना भेटतात त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि तुमच्या मुली जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेत आहेत याची माहिती ही ते आदिवासींना देतात. गेल्या 17 वर्षापासून या मेळघाटातील मुलींना स्वतःच्या पायावरती उभा करण्यामध्ये नायकुडे कुटुंब परिश्रम घेत आहे. आणि यामुळेच प्रत्येक वर्षी मेळघाटा मधून अनेक विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये नर्सिंग क्षेत्रासाठी प्रवेश देखील घेत असतात. शिक्षणाबरोबरच या ठिकाणी आदिवासींचे विविध सण साजरे केले जातात. विशेष करून जागतिक परिचारिका दिनी नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींचा गौरव या संस्थेकडून केला जातो.
What's Your Reaction?






