डिकसळ ते राजेगाव कडे जाणाऱ्या रेल्वे भुयारी मोरीत गटारगंगा ; प्रश्न मार्गी लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील डिकसळ हद्दीतील गेट नंबर २२ च्या भुयारी मार्गाचे काम गेले तिन वर्ष अर्धवट अवस्थेत रखडले असून यामुळे इंदापूर व दौंड या दोन तालुक्याला जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या तसेच येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाशी निगडित असणाऱ्या भुयारी मार्गावरून प्रवासी व शेतकऱ्यांना पर्यायी दूरच्या मार्गाने किंवा आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मोरीला गटर गंगाचे स्वरूप आले असून त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे.
यावेळी शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना गटारातून प्रवास करावा लागत आहे. आणि डिकसळ गावातील 50 टक्के शेतकऱ्यांची शेती रेल्वे लाईनच्या पलीकडील राजेगाव बाजूस असून या ठिकाणावरील शेतमाल घरी, कारखान्यावरती आणि बाजारपेठेत आणण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत आहे आणि दूरवरून हा शेतमाल घेऊन यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
येथील ग्रामस्थ म्हणाले की गावातील पुढारी हे फक्त बेरजेचे राजकारण करण्यात मग्न असून कोणीच कोणाला वाईट होत नाही. त्यामुळे रस्त्याचा आणि भुयारी मार्गाचा प्रश्न सुटत नाही. याचाच त्रास सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.म्हणून गावतील प्रमुख मंडळींनी ऐकत्र येऊन भुयारी मार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे असे शितलकुमार हगारे म्हणाले. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी यांमध्ये लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
What's Your Reaction?