धनगर समाजाचे नेते आ.पडळकरांना अजित पवारांबद्दलचं ते वक्तव्य भोवण्याची शक्यता…वाचा काय आहे प्रकरण
आय मिरर
धनगर समाजाचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली होती.हीच टीका पडळकरांना भोवणार असल्याचं दिसतंय.
बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे.गोपीचंद पडळकरांनी सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही.म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही..अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत असं पडळकरांनी म्हटलं होतं.
यावर आता मी शरद पवार कुटुंबाची कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही.मला कोणतीही नोटीस अद्याप मिळाली नाही. ज्यावेळी नोटीस येईल तेव्हा भुमिका स्पष्ट करणार असल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांवर काय कारवाई होते हे पहावं लागणार आहे.
What's Your Reaction?