मोठी बातमी || राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार खा.सुळे भिगवण मध्ये येणार एकाच मंचावर
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडीलांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीक असणा-या स्वामी चिंचोली येथे अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन वास्तूचे उदघाटन २२ आँक्टोबर रोजी पार पडणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका मंचावर आलेले आहेत मात्र सुप्रिया सुळे त्याला अपवाद होत्या, आता प्रथमच शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे ही तिघे नेते एकाच मंचावर येणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांच्या नावाने नव्याने सुरू होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीक स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम विद्या प्रतिष्ठाण स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटनप्रसंगी पवार कुटुंबीय एका मंचावर येणार आहेत. या नव्या वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहे.त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच हे तिन्ही नेते खरोखरच एका मंचावर येणार की कार्यक्रमाला जाणं टाळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावाच सांगितल्याने आता हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे.अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या राजकीय वर्चस्वालाच आव्हान दिल्याने काका आणि पुतण्यामध्ये वितुष्ट आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र,हे बंड ताजं असतानाच अजित पवार आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
What's Your Reaction?