ऊसाला भाव देण्यापेक्षा कारखान्यांना भाव मिळाला पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न,पटोलेंचा घनाघात

आय मिरर
ऊसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून सरकार काही करत नाही, पण साखर कारखान्याला भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करते, म्हणजे हे सरकार मोठ्या लोकांचं आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ड्रग्स माफिया ललित पाटील याला काही झालं नसताना त्याला ससून हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं गेलं, तिथं त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली. अशा ड्रग्स माफियाला सरकार पाठीशी का घालते असा सवाल पाटोलेंनी केला आहे. सरकारचे लागेबांधे ललित पाटील सोबत आहेत असा आरोपही पाटोलेंनी केलाय.
अकोल्याचा खासदार कॉंग्रेसचाच बनणार असा ठाम विश्वास पाटोलेंनी व्यक्त केलाय, विधान परिषदेत अश्याच प्रकारे उमेदवार निवडून आणला होता, आता खासदार आणू, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त आहे.
What's Your Reaction?






