सोलार पंपामुळे चांगल चालल्यालं बगवल नायं म्हणून केली पंपाची नासधूस ! भिगवण पोलीसात अज्ञाता विरोधात दाखल झाला गुन्हा
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
अकोले परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. त्याच बरोबर शेतातील इलेक्ट्रिक साधनांची तोडफोड करण्यात येत आहे या घटनांमुळे शेतकरी वैतागला असून याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत आहे.शेतकरी महादेव कांबळे यांच्या विहिरीवरील कुसुम सोलर योजनेतून मिळालेल्या पंपाची वायरिंग तोडून नुकसान केल्याने मोठी हानी झाली आहे.
शेतातील विहिरीवर सोलर पंप बसवून पाणी उपसण्यासाठी दिवसा त्याचा उपयोग करण्यात येत होता मात्र एका अज्ञात व्यक्तीने वायरिंग तोडून पाणी उपसा बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मागील दिवसात अकोले परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच लाखाची सोने लंपास केले आहे. त्याचा अजून तपास लागलेला नसून तोपर्यंत विहिरीवरील साधनांची मोडतोड करून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यात येत आहे.यंदा पाऊस कमी असल्या कारणाने शेतकरी आर्थिक अडचणीत असून या भुरट्या चोरी प्रकारामुळे आणखी अडचणी वाढत आहेत.
What's Your Reaction?