बापरे…अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या वस्तू चोरल्या ! कुठे घडली ही धक्कादायक घटना ?
आय मिरर
अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल व इतर महागड्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंची वाहतूक करीत असताना कंटेनर चालकाने 48 लाख रुपयांच्या महागड्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना 12 मार्च ते 14 मार्च याकालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडली आहे.
अनुज सचिव तिवारी (वय 25, रा. वाघोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाहिद इलियास (वय 25, रा. राजस्थाान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरियर ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये आरोपी हा कंटेनर चालक म्हणून काम करत होता. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याने बेंगलोर येथून अॅमेझाॅन कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल, इतर इलेक्ट्रॉनीक वस्तू असा एकूण 1 कोटी 53 लाख 93 हजार 300 रुपयांचा माल भरला.
मात्र पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे आले असता त्यातील 48 लाख 69 हजार 953 रुपयांचा माल हा गायब झाला होता. यावरून कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?