धक्कादायक | सेल्स एक्झिक्युटिव्हचा सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू

Mar 21, 2024 - 14:52
 0  417
धक्कादायक | सेल्स एक्झिक्युटिव्हचा सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू

आय मिरर

बांधकाम साईटवर फ्लॅट दाखण्यासाठी गेलेल्या सेल्स एक्झिक्युटिव्हचा सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाला.याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी तीन महिन्यांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 23 डिसेंबर 2023 रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वाकड येथील निसर्ग बेलारोझ सोसायटी या बांधकाम साईटवर घडली. 

आशिष जव्हेरी (वय-43) असे मृत्यू झालेल्या सेल्स एक्झिक्युटिव्हचे नाव आहे. याबाबत आशिष यांच्या पत्नीने मंगळवारी (दि.19 मार्च) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ठेकेदार गुंडू कसनु पवार (वय-40 रा. सिद्धी निसर्ग असोसिएट, भुमकर वस्ती, हिंजवडी) व अभिषेक अभय देवने (वय-26 रा. आदित्य अपार्टमेंट, वाकड) यांच्यावर आयपीसी 304(अ), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे पती आशिष हे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. 23 डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास आशिष हे वाकड येथील निसर्ग बेलीरोझ सोसायटीच्या बांधकाम साईटवर ग्राहकांना फ्लॅट दाखवण्यासाठी गेले होते. सहाव्या मजल्यावर फ्लॅट दाखवत असताना फिर्य़ादी यांच्या पतीचा तोल गेला. त्यामुळे ते सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमध्ये पडले.

यामध्ये फिर्यादी यांचे पती गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.आरोपींनी बांधकाम साईटवर सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो याबाबत निष्काळजीपणा करुन त्याठिकाणी काम चालु असतानाकामगारांच्या सुरक्षेची तसेच सदनिका पाहण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. आरोपींच्या निष्काळजीपणामुळे आशिष यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow