शेतकऱ्यांपुढे नवं संकट ! माळवाडीत उजनी काठी काय घडलं ? वाचा सविस्तर

Apr 24, 2024 - 18:28
Apr 24, 2024 - 19:21
 0  4019
शेतकऱ्यांपुढे नवं संकट ! माळवाडीत उजनी काठी काय घडलं ? वाचा सविस्तर

आय मिरर(देवा राखुंडे)

ऐन उन्हाळ्यापूर्वीच उजनी धरणांन तळ गाठल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय.शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर असताना उजनी काठच्या शेतकऱ्यांना आता भलताचं त्रास सहन करावा लागतोय. 

इंदापूर नजीक असणाऱ्या माळवाडी नंबर २ येथील उजनी काठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची तोडफोड करून त्यामधील तांब्याच्या तारा चोरीस जाण्याचा प्रकार मंगळवारी 23 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडलाय.सुमारे अशीच घटना गेले पंधरा दिवसा खाली गलांडवाडी नंबर एक परिसरात घडली होती असं ही या शेतक-यांचं म्हणण आहे.

या घटनेत अज्ञातानं दादासाहेब पिसे यांची 25 एचपी ची मोटर, सचिन मोरे यांची 20 एचपी मोटर, माधव मोरे यांची 20 एचपी ची मोटर, रंगनाथ म्हेत्रे यांची वीस एचपी ची मोटरीचं नुकसान केलं असून साधारण आम्हा सर्वांचे मिळून दीड लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं शेतकरी दादासाहेब पिसे यांनी सांगितले आहे. 

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणगाव परिसरात देखील पाठीमागे काही महिन्यापूर्वी अशाच पद्धतीच्या घटना घडल्या होत्या आणि संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं होतं. आता त्यानंतर हेच लोन माळवाडीच्या पट्ट्यात पोहोचलयं. त्यामुळे इंदापूर पोलीस आता या सराईत चोरट्यांचा कसा छडा लावणार हेही महत्त्वाचं असणार आहे.दरम्यान या संदर्भात वृत्त प्रसारित करेपर्यंत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसून लवकरच आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow