जिनं घवघवीत यश मिळवलं, तिच पाहायला उरली नाही जगात ; वाचा हीर सोबत काय घडलं

May 16, 2024 - 18:32
May 16, 2024 - 18:32
 0  182
जिनं घवघवीत यश मिळवलं, तिच पाहायला उरली नाही जगात ; वाचा हीर सोबत काय घडलं

आय मिरर

16 वर्षीय हीरला 99.7 गुण मिळताच तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. आता आपल्या मुलीला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. हव्या त्या क्षेत्रात ती यशस्वी करियर करू शकेल, असं तिच्या पालकांना वाटलं.हीरनेही उराशी अनेक स्वप्न बाळगली होती. मोठं होऊन तिला डॉक्टर व्हायचं होतं, समाजसेवा करायची होती, इतरांना नवजीवन द्यायचं होतं. म्हणूनच तिने अभ्यासात कोणतीही कसर सोडली नव्हती.

हीरला परीक्षेत घवघवीत यश मिळालं खरं, परंतु नियतीपुढे मात्र ती हरली. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. ब्रेन स्ट्रोकनं तिची सगळी स्वप्न, तिची उरलेली वर्ष हिरावून घेतली.16 वर्षीय हीरवर 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची ब्रेन सर्जरी झाली. जरा बरं वाटल्यानंतर घरी पाठवण्यात आलं, परंतु तिला अचानक श्वास घ्यायला त्रास झाल्याने थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. ब्रेन एमआरआयचे रिपोर्ट आल्यानंतर कळलं की, तिच्या मेंदूचा 80 ते 90 टक्के भाग निष्क्रिय झाला होता. अखेर 15 दिवसांच्या उपचारांनंतर हीरची मृत्यूशी झुंज संपली. तिनं श्वास सोडला.

गुजरातची रहिवासी असलेल्या हीरचे डोळे राजकोटमधील 2 व्यक्तींना दान करण्यात आले आहेत, तर तिचं शरीर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दान करण्यात आलंय. त्यामुळे हीरला डॉक्टर होता आलं नसलं तरी तिनं 2 व्यक्तींना नवजीवन देण्याचं कार्य चोख पार पाडलंय. शिवाय तिच्या शरिराचा अभ्यास करून आता भविष्यात कित्येक विद्यार्थी डॉक्टरकीची पदवी मिळवतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow