निमसाखर परिसरात झाडांची पडझड,विजेचे खांब जमिनीवर आडवे तर सौर उर्जेच्या प्रकल्पांची उलथापालथ
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात निमसाखर च्या भागात वादळ वाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली असून सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची उलथापालथ झाली आहे. विद्युत वाहक तारांचे खांब देखील जमिनीवर आडवे झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झालाय.तर काहींच्या घराचे छत उडाले आहेत.
नारायण लक्ष्मण रणमोडे यांच्या शेडचे नुकसान झाले असून नानासाहेब सर्जेराव रणमोडे आणि दत्तात्रय यशवंत सूर्यवंशी यांच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या प्लेटा उलथून पडल्या आहेत.
यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही तरी प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे आणि सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी रणमोडे वस्तीवरील ग्रामस्थांची मागणी आहे.
What's Your Reaction?