विजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कांदलगावात राबवले रक्तदान शिबिर

आय मिरर
कांदलगावात माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजय सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयु.विजय नाना सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 83 रक्तदात्याने रक्तदान करून आपली सामाजाप्रती जबाबदारी दाखवली.
18 मे रोजी विजय सोनवणे यांचा वाढदिवस असतो, हा वाढदिवस सामाजीक उपक्रम राबऊन साजरा करण्यात येतो. याप्रसंगी 83 रक्तदात्याने रक्तदान केले.या शीबीरास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षा चे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवने, वंचित बहुजन आघाडीचे सोलापुर जिल्हाध्यक्ष राहुल चव्हान ,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प.महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे , पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,शहा ग्रापंचायतचे सदस्य दिलीप पाटील,विशाल जगताप,गणेश पाटिल,नागेश पाटील,मुन्नाभाई नायकुडे,राघु कारंडे,सीद्धार्थ चितारे,निखील बगाडे,सुरज धाईजे, शहा गावचे नितिन निकम , संतोष निकम विकास भोसले, तुषार भोसले, अनिल कडाळे यांसह विजय सोनवणे यांचा मित्रपरीवार मोठ्या संख्येने उपस्थीत होता.
What's Your Reaction?






