बारा-पंधरा तासांमध्ये जामीन मिळतो कसा? पुणे हिट अँड रन प्रकरणी युगेंद्र पवारांनी उपस्थित केला प्रश्न

May 21, 2024 - 15:17
May 21, 2024 - 15:19
 0  200
बारा-पंधरा तासांमध्ये जामीन मिळतो कसा? पुणे हिट अँड रन प्रकरणी युगेंद्र पवारांनी उपस्थित केला प्रश्न

आय मिरर

पुण्यातील हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातातील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काही लोकांना महिनाभर जेलमध्ये बसावं लागतं मात्र काही लोकांना बारा-पंधरा तासांमध्ये जामीन मिळतोय तो पण रविवारी.मला आश्चर्य वाटलं एवढ्या कमी वेळात कसा काय जामीन मिळाला अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे.

दरम्यान पुणे हिट अँड रन प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना उडवल्यानंतर संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड केली होती. संतप्त नागरिकांनी कारच्या काचांवर दगड आपटून तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच पुण्यातील दुचाकीवरील दोघांना उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत असताना कारने दोघांना उडवलं. भरधाव वेगात असलेल्या कारने उडवल्यानंतर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. दोघांना उडवल्यानंतर या अल्पवयीन कारचालकाने कार पुढे नेली. त्यानंतर नागरिकांनी या आरोपी मुलाला अडवलं. या भीषण अपघातानंतर नागरिकांनी पोर्शे कारची तोडफोड केली.

घटनास्थळी असलेल्या संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड करण्यात आली. कारच्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच सोशल मीडियावर दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

मी अजून तेवढा त्याच्यावरती विचार केला नाही - युगेंद्र पवार

मी अजून तेवढा त्याच्यावरती विचार केला नाही, विधानसभा अजून खूप लांब आहे. लोकसभा तर आत्ताच झाली आहे. लोक चर्चा करत असतील पण मी आता सध्या लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. उद्याचं आपण बघू म्हणत युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा लढविण्याबाबत सस्पेंन्स ठेवला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow