इंदापुरात दुध रस्त्यावर ओतून नोंदवला सरकारचा निषेध,दुधाला प्रति लिटरला 40 रुपये दर देण्याची मागणी
आय मिरर
दुधाला प्रति लिटरला चाळीस रुपये दर मिळाला पाहजे या मागणीसाठी पुण्याच्या इंदापूरात बाबा चौकात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलेय. रस्त्यावर दूध ओतून देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या दूध उत्पादकांनी कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, दुधाला चाळीस रुपये प्रति लिटरला दर मिळालाच पाहिजे, या सरकारचं करायचं काय खाली मुंड वर पाय अशी जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळासाठी इंदापूर शहरातून जाणारा जुना पुणे सोलापूर मार्ग रोखून धरण्यात आला. याचबरोबर रस्त्यावरती दूध ओतून देत सरकारच्या दुधाविषयीच्या धोरणांचा आंदोलकांनी निषेध नोंदवला.
या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि मंडल अधिकारी हगारे यांनी स्विकारले आहे.यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
What's Your Reaction?