वलांडी येथील घटनेच्या निषेधार्थ इंदापूर शहर हिंदू खाटीक समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Feb 2, 2024 - 15:57
 0  280
वलांडी येथील घटनेच्या निषेधार्थ इंदापूर शहर हिंदू खाटीक समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

आय मिरर(देवा राखुंडे)

देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथे सहा वर्षांच्या चिमुकलीवर २३ वर्षांच्या युवकाने लैंगिक अत्याचार केला होता. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान हा अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी ०२ फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास इंदापूर शहर सकल हिंदू खाटीक समाजाने काळ्या फिती बांधून इंदापूर तहसीलवर मुक मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन समाजाच्या वतीने इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले आहे.

इंदापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सुरू झालेला हा मोर्चा जुन्या पुणे सोलापूर मार्गाने इंदापूर तहसील कार्यालय वरती दाखल झाला. मोठ्या संख्येने हिंदू खाटीक समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.काळ्याफिती लावून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. 

सदरचे प्रकरण फास्ट्रॅक न्यायालयात चालवावे, तसेच आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत पीडीत कुटूंबीयास पोलिस संरक्षण देऊन आरोपीला व त्याच्या कुटूंबीयांना गांवबंदी करण्यात यावी.पीडीत बालीकेचा पुर्नवसनाचा (शैक्षणिक इ.) संपूर्ण खर्च शासनाने करावा.पिडीत कुटूंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी तसेच त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी. सदरच्या घडलेल्या घटनेमुळे धार्मिक/जातीय तेढ अथवा तनाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रसासनाच्या वतीने घेण्यात यावी.अशा विविध मागण्या समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

या मोर्चाला महादेव सोमवंशी शिवसेना उद्धव बा.ठाकरे गट,ओबीसी नेते पांडुरंग शिंदे,मा.नगरसेवक अनिल राऊत, वडार समाजाचे सोमनाथ पवार, बंडा पाटील,इंदापूर नागरी संघर्ष समितीचे प्रा.कृष्णा ताटे आदींनी सहभागी होऊन पाठींबा दर्शवत या गंभीर घटनेचा निषेध नोंदवला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow