इंदापूर नगर परिषदेची अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई
आय मिरर
इंदापूर शहराच्या विविध भागात अनाधिकृत पणे फ्लेक्स लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्स वर इंदापूर नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात प्रफुल 37 फ्लेक्स काढून जप्त करण्यात आले आहे.
इंदापूर नगर परिषदेने इंदापूर शहरात लावलेल्या अनाधिकृत होर्डिंग वरती कारवाई केली.यामध्ये शहरातील बाबा चौक, पंचायत समिती, एस. टी बस स्थानक परिसर, अकलुज नाका या भागात लावलेले अनाधिकृत फ्लेक्स हटवण्यात आलेत. इंदापूर शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृत फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ज्या फ्लेक्स ला नगरपरिषदेकडून परवाना घेतला नव्हता असे सर्व फ्लेक्स हटवण्याचा निर्णय इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी घेतला.
त्यानुरूप नगरपरिषदेच्या यंत्रणेने शहरातील हे अनाधिकृत फ्लेक्स हटवले आहेत.तसेच यापुढेही कारवाईत सातत्य ठेवले जाणार असल्याचे सांगितले.
What's Your Reaction?