फडणवीस आज इंदापुरात येऊन काय बोलणार ? कोणत्या गोष्टीवर होणार शिक्कामोर्तब ?

Apr 4, 2024 - 21:19
Apr 5, 2024 - 08:21
 0  380
फडणवीस आज इंदापुरात येऊन काय बोलणार ? कोणत्या गोष्टीवर होणार शिक्कामोर्तब ?

आय मिरर(देवा राखुंडे)

सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरतेय. कारण या निवडणुकीत थेट शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने सामने मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

या निवडणुकीत महाराष्ट्राचा दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना इंदापूर विधानसभा मतदारसंघात मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चांगलंच बोळीत गाठलेय. राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असताना इंदापुरात मात्र हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते अर्थात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जणू काय अजित पवारांवर गेल्या शंभर वर्षांचा सूड उगवतात की काय असंच वातावरण निर्माण झालंय. 2019 च्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत वाटेल ते झाले तरी चालेल पण इंदापूरची जागा सोडणार नाही अशी गर्जना करणारे अजित पवार 2024 च्या लोकसभेच्या मैदानात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विरोधी भुमिकेपुढे अक्षरशा थंड पडलेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते माझे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात असणारं राजकीय वैर अवघ्या राज्याला ज्ञात आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून तब्बल चार वेळा हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पवार घराण्याला मदत केली. हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीच्या जोरावरच सुप्रिया सुळेंनी तब्बल तीन वेळा दिल्लीचं तक्त गाठलं. मात्र 2019 2014 2009 आणि 2004 या चारही वेळेला लोकसभेला मदत करून देखील विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना पवार कुटुंबाकडून दगाच झाला आणि त्यामध्ये अजित पवारांचा मोठा सहभाग होता, त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा थेट आरोपच हर्षवर्धन पाटलांच्या कन्या आणि भाजपा युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी करीत अगोदर 2024 च्या विधानसभेचा बोला जे आमचं काम करतील त्यांनाच लोकसभेला मदत करू असं म्हणत थेट अजित पवारांनाच बोळीत गाठलं.

पाटील यांच्या कन्या युवा नेत्या अंकिता पाटील ठाकरे यांनी इशारा देताच हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता पेटून उठला. आमच्या नेत्याच्या आदेशावरून आम्ही 2004 पासून सलग चार वेळा लोकसभेला तुम्हाला मदत करतो मात्र लोकसभा होताच विधानसभेला तुम्ही विरोधी भूमिका घेत दगा देता त्यामुळे यंदाच्या लोकसभेला अजितदादा सोडून बोला अशी थेट आक्रमक भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

2014 च्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असणारे दत्तात्रय बने यांकडून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसाबसा पचवला.त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीला पवार कुटुंबाला साथ न देण्याची भूमिका हर्षवर्धन पाटील यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. मात्र 2019 च्या लोकसभेत सुप्रिया सुळे अजित पवार आणि शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली आणि त्यांचं मन वळवण्यात ते यशस्वी झाले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभेला आपणाला शब्द दिला आहे आणि त्याच शब्दाच्या जोरावर आपण पुन्हा एकदा लोकसभेला सुप्रिया सुळे यांना अर्थात पवार घराण्याला मदत करीत आघाडीचा धर्म पाहणार असल्याचे सांगितलं. हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशापुढे कार्यकर्तेही तयार झाले आणि इंदापूर मधून 2019 ला सुप्रिया सुळे यांना तब्बल 69 हजार हून अधिकचं मताधिक्य मिळालं.

म्हणून हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सोडली होती…

मात्र लोकसभेच्या निवडणुका होताच पुन्हा अजित पवारांनी आपला शब्द फिरवण्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीला पुण्यामध्ये आपण पवार कुटुंबीयांसोबत बसलो होतो तेव्हा इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरलं होतं मात्र आता अजित पवार शब्द फिरवत असून आपल्या सोबत दगा झाला आणि आपल्याला फसवलं गेला असा आरोप अजित पवारांसह पवार कुटुंबीयांवर ठेवत हर्षवर्धन पाटील यांनी केला. याच दरम्यान वाटेल ते झालं तरी बेत पार परंतु इंदापूर ची जागा सोडणार नाही अशी गर्जनाच अजित पवारांनी केली.आणि अखेर पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं.

2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टीमध्ये लढत झाली आणि 2014 ला 14000 हून अधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार दत्तात्रय भरणे हे काठावर पास झाले तर हर्षवर्धन पाटील हे अल्पमताने पराभूत झाले. हर्षवर्धन पाटील हे तब्बल दहा वर्ष सत्तेतून बाजूला आहेत. गेल्या दीड वर्षापासून राज्यात शिवसेना आणि भाजपचं अर्थात महायुतीचे सरकार सत्तेत आलो आणि हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा चुकीचे दिवस आले. 2024 च्या विधानसभा निवडणूकीत जीवाचं रान करायचं पण आपला नेता विधानभवनात पाठवायचाच अशी खूणगाठ बांधून भाजपचे कार्यकर्ते हे कामाला लागले.

मात्र यातही माशी शिंकली आणि नको असलेले अजित पवार पुन्हा हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय मार्गात अडसर ठरले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांनी भाजप सोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार रान पेटलं.

सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे.भारतीय जनता पार्टी,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत.लोकसभा 2024 ची निवडणूक लागलेली असताना इंदापुरात मात्र विधानसभेच्या जागेवरून रणकंदन माजलेय. 2019 च्या विधानसभेत आमने-सामने लढलेले राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आता 2019 ला काय करणार आणि कसं लढणार या चिंतेने ग्रासलेत. पुन्हा एकदा अजित पवार महायुती मधून इंदापूरच्या जागेवरती दावा करतील आणि हे आम्हाला मान्य नाही असा पवित्रा घेत लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म न पाळण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवार सोडून काहीही बोला पण अजित पवार नको रे बाबा… अशीच भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलीय…आणि यामुळे ऐन लोकसभेत अजित पवारांची इंदापुरात मोठी गोची झाली आहे.

शिवतारेंचं बंड शमलं पाटलांचं काय?

दरम्यान शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनाही अजित पवारांनी दिवसला होता आणि याचा बदला घेण्यासाठी विजय शिवतारे हे दंड थोपटून मैदानातही उतरले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार की काय अशी चर्चा असताना शिवतारेंच बंड थंड करण्यात अजितदादांना यश आलं मात्र इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना शांत करण्यात अजितदादा अद्याप पर्यंत यशस्वी झाले नाहीत.

याचा फटका महायुतीला बसू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांना सागर बंगल्यावरती बोलावलं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांसमोर आपली भूमिका ही मांडली. त्यानंतर फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबत सागर बंगल्यावर एक बैठकी घेतली. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठीशी भाजपा ताकतीने उभा आहे आणि त्यांचं नेतृत्व भाजपा मोठं करणार आहे असा शब्दही फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. यासोबत आपण इंदापुरात येऊन भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत संवाद साधू आणि त्यांच्या अडचणीही समजून घेऊ आणि यावरती तोडगा काढू असं आश्वासनही फडणवीसांनी इंदापूरच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सागरवर दिलं.

देवेंद्र फडणवीस मैदानात…

तिकडे सागर बंगल्यावरती फडणवीसांनी इंदापूरच्या भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची मनधरणी करत त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.परंतु इंदापुरात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यात आजही आरो प्रत्यारोपांचे भडके उडत आहेत. महायुतीचा प्रचार म्हणून इंदापुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही एकत्र दिसत नाहीत हर्षवर्धन पाटील ही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत नाही. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि महायुती म्हणून दोघांना एकत्र आणण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत इंदापुरात येण्याचा निर्णय घेतलाय.

बंड होणार थंड ? 

शुक्रवारी पाच एप्रिल रोजी जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुका भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.आता या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनी असणार देवेंद्र फडणवीसांच्या जाहीरपणे गळी उतरेल का? इंदापूर भाजपला कोणता ठोस शब्द देणार? कोणत्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करणार आणि अजित पवारांविरोधात ठाकलेले भाजपचे कार्यकर्ते महायुतीत ते सक्रिय कसे करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow