आ.मानेंच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून झाला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
आय मिरर
तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द असणा-या इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दि.०५ एप्रिल रोजी करण्यात आला.यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची घोंगडी बैठक आमदार माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,पंचायत समिती माजी सभापती प्रशांत पाटील,मा.जि.प.सदस्य श्रीमंत ढोले,बापूराव शेंडे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,दत्तात्रय घोगरे,सतीश पांढरे,शिवाजी तरंगे, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब काळे,संग्रामसिंह पाटील,श्रीकांत बोडके,दशरथ राऊत,जगदीश सुतार,गौरव दंडवते,नितीन सरवदे,चंद्रकांत सरवदे,विठ्ठल देशमुख,शंकर राऊत सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?