पिडीसीसीच्या मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक - आ.रोहित पवारांचं ट्विट
आय मिरर
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकावरती निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत ही कारवाई धुळफेक असल्याचे म्हटले आहे.
पिडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे.मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.तसंच त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे.असं रोहित पवार यांनी म्हटलयं.
PDCC बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे... मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे... तसंच त्या रात्रीचं #CCTV… pic.twitter.com/Ud7cmamjHU — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 11, 2024
बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी.असही रोहीत पवारांनी म्हटलयं.
What's Your Reaction?