दादा अन् मी जन्मापासून एकत्र : पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेंवर सुळेंची प्रतिक्रिया 

Jun 8, 2025 - 12:21
Jun 8, 2025 - 12:22
 0  594
दादा अन् मी जन्मापासून एकत्र : पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेंवर सुळेंची प्रतिक्रिया 

आय मिरर 

गेल्या काही दिवसापासून बारामतीच पवार कुटुंब एकत्र येईल अशा चर्चांनी जोर धरला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक सकारात्मक विधान केलं आहे. जन्मापासून अजित पवार आणि मी एकत्रच असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रसार माध्यमांना दिली आहे.सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवार गटाचे नेते विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वी बहिण भाऊ एकत्र येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.यावरून सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता अगोदर सुळे म्हणाल्या कोणते बहीण भाऊ आणि त्यावर पत्रकारांनी खुलासा केला असता सुळे म्हणाल्या जन्मापासूनच अजित पवार आणि मी एकत्र आहे.

अमोल मिटकरी यांची जी इच्छा आहे त्यांच्या शुभेच्छा बद्दल मी त्यांचे आभारी आहे.सुळे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती इंदापूर दौंड तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत. तत्पूर्वी बारामती मधील नगर परिषदेच्या विरोधात सुरू असलेल्या पथविक्रेत्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यांच्या अडचणी समजून घेत थेट मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत यावरती मार्ग काढण्याच्या सूचना सुळे यांनी केल्या यासोबत पथविक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास ही सुळे यांनी दिला यानंतर सुळे प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

माझं आंदोलकांशी सविस्तर बोलणं झालं आहे मी मुख्याधिकाऱ्यांनाही बोलली आहे. केंद्र सरकारने पदविक्रेत्यांसाठी वेगळी पॉलिसी केली आहे त्याचा अवलंब बारामती नगर परिषदेने करावा अशी आंदोलकांची मागणी आहे. बारामतीत हॉकर्स झोन केले आहेत त्याचं हस्तांतरण बारामतीत झालं नाही.देशाचा जो कायदा आहे त्याप्रमाणे त्यांना ती संधी मिळावी. दोन्ही बाजूने बसून मार्ग निघू शकतो असंही सुळे म्हणाल्या.

शेवटचा कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन निर्णय...

दोन्ही राष्ट्रवादी ने एकत्र यायचं की नाही हा निर्णय माझा एकट्याचा होऊ शकत नाही.कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक पाहिलेली आहे.पवार साहेब जो काही निर्णय करतात मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीने होतं.जो काही पक्षाचा निर्णय असेल तो शेवटचा कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्याच्या मनात जे असेल तो निर्णय पक्ष घेईल.

मी ऑपरेशन सिंदूरच्या कामातच होते. 14 दिवसानंतर मी कालच मतदारसंघात आले. ऑपरेशन सिंदूर मध्ये 14 दिवसांचा गॅप झाला.काल भोर आणि मुळशी भागात नुकसानीचे पाहणी केली.उद्या दिल्लीला चालली आहे परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटेल त्यावेळी त्यांच्या मनात काय आहे ते मला कळेल. असंही सुळे यांनी म्हटलं.

बारामती इंदापूरचा काही भाग आणि दौंडचा काही भागात अतिवृष्टी झाली. यात सर्वात जास्त पाऊस बारामती मध्ये झाला. नुकसान देखील झाल. मुळशीच्या काही भागाचही नुकसान झाले आहे.सरकारने पंचनामे करायला सांगितले आहेत ते सुरूची आहेत.मी परदेशात होते तरीदेखील सकाळ संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेत होते. जिल्हाधिकारी ही दोन दिवस बारामतीत मुक्कामी होते.तीनही तालुक्याचे आमदार हे या परिस्थितीत मैदानात होते. यात राजकारण करायची कारण नाही मी त्या आमदारांचे आभार मानते. सरकारने नुकसान ग्रस्तांना चांगली मदत करावी अशी मागणी केली आहे आजही करत आहोत.

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ...

सध्या बारामती मधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे या निवडणुकीवरून ही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. या या निवडणुकीत शरद पवार गटाने उतरायचे की नाही याबाबत आज पाच वाजता गोविंद बागेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत शेतकऱ्यांचा मुद्दा ते समजून घेतील.साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्हाला राजकारण आणण्याची इच्छा नाही.आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ.अगोदरही घेत आलो आहोत आजही घेऊ आणि उद्याही घेऊ.पक्ष म्हणून आम्ही कधी लढलो नाही आणि लढणारी नाही.शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेऊ.शरद पवार शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेणार आहेत आणि निर्णय घेतील असं सुळे म्हणाल्या.

पवार कुटुंबावर बोलताना सुळे म्हणाल्या पवार कुटुंबातील कोण कुठे आहे ते मला माहित नाही.मी आज इंदापूर बारामतीला दौंडला फिरणार आहे उद्या मी दिल्लीला जाणार आहे.इन्कम टॅक्सच्या महत्त्वाच्या मीटिंग होणार आहेत आणि एक जुलै च्या अगोदर आम्हाला बिल फायनल करायचे आहे.पाच लोक ऑपरेशन सिंदूर च्या कमिटीत होतो. त्यातील तीन आणि अध्यक्ष होतो.गेले दहा-बारा दिवस इन्कम टॅक्सच्या कमिटीला वेळ देऊ शकलो नाही.एक जुलैच्या अगोदर बिल फायनल करायच आहे त्यासाठी पुढचे काही दिवस इन्कम टॅक्सच्या कमिटीसाठी वेळ द्यावा लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow