२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री झाले पाहिजेत- बावनकुळे, अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Oct 12, 2023 - 10:29
 0  79
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री झाले पाहिजेत- बावनकुळे, अजित पवारांच्या भूमिकेकडे  सर्वांचे लक्ष

आय मिरर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्याचे वक्तव्य केलं होतं. असं असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आग्रही विधान केल्याने शिंदे- फडणवीस आणि पवार सरकारमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमीच तत्पर आहेत. परंतु, ‘ती’ संधी उपलब्ध होत नसल्याने ते वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनीच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्धार केल्याने अजित पवार काय भूमिका घेणार हे देखील बघणे महत्वाचे आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. महाविजय २०२४ अंतर्गत मावळ लोकसभा प्रवास, दौरा घर चलो अभियानांतर्गत बावनकुळे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुन्हा एकदा देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशी गर्जना केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा महाविजय झाल्यास पुढील पंधरा वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता राहील. पंधरा वर्षे भाजप सत्तेतून जाणार नाही. देशातील अव्वल क्रमांकाच महाराष्ट्र राज्य बनवायच असून यासाठी २० नोव्हेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. महाराष्ट्रात एक हाती सत्ता येत नाही, याची खंत वाटते. यावर्षी भाजपला महाविजय करण्यासाठी कामाला लागा. अस आवाहन त्यांनी केले आहे. पदाधिकाऱ्यांना मावळ लोकसभा, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार ५१ टक्के मते घेऊन शंभर टक्के जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा असो की लोकसभा या ठिकाणचे उमेदवार हे तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील असं देखील स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow