माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट

Oct 12, 2023 - 14:08
 0  79
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट

आय मिरर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भेट घेतलीय. इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिलीय. 

या भेटीत इंदापूर तालुक्यातील विविध विकास संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या भेटीत देवेंद्रजी फडणवीस यांचेबरोबर भाजप पक्ष संघटना बळकटीकरणा संदर्भातही हर्षवर्धन पाटील यांचा संवाद झाला. या दोन्ही भेटी प्रसंगी निहारजी ठाकरे, निरा भिमा कारखान्याचे संचालक व इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow