कुणबी जात प्रमाणपत्र तपासणीसाठी नियुक्त समिती छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली,लोकांनी आणली दोनशे तीनशे वर्षांपूर्वीची तांब्याची भांडी

आय मिरर
सन १८८१ च्या जनगणनेत सर्वाधिक कुणबी म्हणून मराठवाड्यात नोंद होती. कालांतराने हैद्राबाद निजाम संस्थान १९६० ला गेल्यानंतर या नोंदी कमी कमी होत गेल्या.
२०० ते ३०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मराठा पंच मंडळाकडे या जुन्या नोंदी आहेत. तेव्हापासून या पंच मंडळाकडे निजामकालीन जुनी भांडी आहेत. भांडी तांब्यांची आहेत. ज्यावर स्पष्टपणे कुणबी म्हणून उल्लेख आहे.
पूर्वीचे मराठा हे मुळचे कुणबीच आहेत. खासरा पत्राच्या नोंदीनुसार सुध्दा शेती व्यवसाय करणारे मराठा समाजाचे लोक हे कुणबी म्हणून ओळखले जातात. बेगमपुऱ्यातील अनेक नागरिकांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबी अशी नोंद आहे. आजही लग्न कार्यात पत्रिका न वाटता आमंत्रण देण्याची पारंपरिक पध्दत चालू आहे. या जुन्या भांड्यांवरील नोंदी मराठा कुणबी एकच असल्याबाबतचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी मराठा पंच मंडळाने समितीकडे केली आहे.
‘कुणबी-मराठा’ आरक्षण समितीकडून दस्तऐवजाची तपासणी
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व समिती सदस्य बुधवारी (दि. ११) छत्रपती संभाजीनगरात आले होते. दुपारी चार वाजेपर्यंत समितीने दस्तऐवजाची तपासणी केली. यानंतर ही समिती जालन्याकडे रवाना झाली. जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात देखील गुरुवारी दस्तऐवजाची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, आज नागरिकांनी कुणबी मराठा असल्याचे पुरावे समितीसमोर सादर केले. बेगमपुरा येथील मराठा पंच मंडळाने कुणबी मराठा असा उल्लेख असलेली जुनी भांडी समितीला दाखविण्यासाठी आणली होती. त्यासोबतच समितीला मराठा पंच मंडळाने निवेदन देखील दिले. याशिवाय २२ लाख पुरावे आतापर्यंत तपासण्यात आले आहेत. त्यात ५०० वर नोंदी महसूल विभागाच्या हाती लागल्या आहेत.
What's Your Reaction?






