दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांची गरज जाणली ! वाढदिवसानिमित्त दिला गावातील जिल्हा परिषद शाळेला साऊंड सिस्टीम संच भेट
आय मिरर
शहा गावचे प्रसिध्द व्यवसायिक आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिलीप पाटील यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहा गावातील जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक साऊंड सिस्टीम संच भेट दिला आहे.
गावात पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून जिल्हा परिषदेच्या या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेकांची मुले या ठिकाणी शिक्षण घेत असून त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासह सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अत्याधुनिक साउंड सिस्टीम संचाची गरज होती.वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी काहीतरी करु शकलो याचे सर्वात मोठे समाधान असल्याची प्रतिक्रिया दिलीप पाटील यांनी दिली आहे.
यावेळी माजी सरपंच विष्णु पाटील,लहु निकम,महादेव लांडगे,प्रशांत निंबाळकर, संतोष निकम,अशोक भोई,संजय निकम,दत्तात्रय नगरे,दादा माने,शरद भोई,मुख्याध्यापक श्री.कचरे,शिक्षक श्री.मोरे,श्री.शिंदे,शिक्षिका श्रीमती शिंदे यांसह ग्रामस्त उपस्थित होते. पाटील यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकचा वाव मिळणार असल्याने मुख्याध्यापक कचरे यांनी पाटील यांचे आभार मानले.
What's Your Reaction?