मध्यरात्री भिगवण मध्ये तरुणांचा गोंधळ,पोलिसांनी सात जणांवर दाखल केला गुन्हा

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मधील भिगवण गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी रात्री उशिरा आपापसात शिवीगाळ दमदाटी करून गोंधळ घालत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी भिगवण पोलिसांनी सात ते आठ जणांच्या टोळक्यावरती गुन्हा दाखल केला आहे.
भिगवण पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याची गंभीर दखल घेत भिगवण पोलिसांनी थेट कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार विजय शंकर लोडी यांनी फिर्याद दिली असून, सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर इतर सात ते आठ अनोळखी इसमानविरोधात देखील पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलेला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मिसाळ करत आहेत.
What's Your Reaction?






