बिग ब्रेकिंग | दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगार्‍यात सापडले अर्भक ?

Mar 25, 2025 - 12:40
Mar 25, 2025 - 12:44
 0  1589
बिग ब्रेकिंग | दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगार्‍यात सापडले अर्भक ?

आय मिरर

दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊन च्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगार्‍यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याची माहिती मिळत असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या 112 क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर या ठिकाणी दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावण्यात आले.

हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता घेतला जात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरणीत असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते 2020 मधील आहेत अशी माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. मात्र हे कचऱ्याच्या ढिकाऱ्यात कसे आले याचा शोध घेतला जात आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow