शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या तांब्याच्या तारा अज्ञाताने चोरल्या, इंदापूरच्या हिंगणगावातील प्रकार ! शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर तालुक्यातील हिंगणगांव मध्ये भीमा नदी काठच्या परिसरातून पाण्याच्या विद्युत मोटारींच्या आतील तांब्याच्या तारांची चोरी झाल्याचा प्रकार बुधवारी दि.१० जानेवारीच्या रात्री आणि ११ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास घडला आहे. पाच विद्युत मोटारींच्या आतील तांब्याच्या ताराचं अज्ञात चोरट्याने चोरी केल्यानं संतप्त शेतकरी वर्गाने थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठत न्यायाची मागणी केली आहे.
हिंगणगांव मधील गुलाब जगताप, दगडू देवकर,अनंता देवकर,अमोल जनार्धन देवकर आणि दत्तात्रय यादव या पाच शेतक-यांच्या विद्युत पंपांच्या तांब्याच्या तारा अज्ञाताने चोरी केल्या आहेत.या संदर्भात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
वारंवार असे चोरीचे प्रकार घडत असून अद्याप हे सत्र सुरुच आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी या परिसरातून समाधान देवकर, गुलाब जगताप आणि दत्तात्रय यादव या तीन शेतक-यांच्या विद्युत पंपांची अज्ञाताने चोरी केली होती,चार वर्षावर्षापूर्वी तर याच परिसरातून विद्युत रोहित्राचीचं चोरी झाली होती,तोच आज पुन्हा चोरीचा प्रकार घडला असून आता तर थेट मोटारींच्या आतील तांब्याच्या ताराचं अज्ञाताने चोरी केल्याचा प्रकार घडल्याचे संबंधित शेतक-यांनी सांगितले आहे.गेल्या अनेक वर्षापासून असे प्रकार घडत असून वारंवार पोलिसात तक्रारी देऊन देखील गुन्हेगारांचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप ही संबंधित शेतक-यांनी केला आहे.
आज उजनी तळ गाठू लागलीय, कांद्याला दूधाला दर नाही,ऊसाची बिले वेळवर मिळत नाहीत अशा अनेक संकटांनी शेतकरी ग्रासला गेला असताना शेतक-यांवर हे नवं संकट कोसळल्याने शेतक-यांना अक्षरश: अश्रु अनावर झाले आहेत.
What's Your Reaction?