कोलकाता आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बारामतीत विद्यार्थ्यांची निषेध रॅली
आय मिरर
कोलकता आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बारामतीत राष्ट्रीय सेवा योजना आणि डेलॉनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी हाताला काळी रिबीन बांधत व हातात बॅनर घेऊन महिलां विरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधाचे फलक झळकावले. दोन्ही घटनांमधील आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
महिलांवर होणारे अत्याचार हा आजही जगातील विकसनशील देशांसह प्रगत देशांमध्ये संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे जगातून महिला अत्याचारांचे हे सत्र संपुष्टात आणण्यासाठी भविष्यात याबाबतीत अतिशय कठोर कायदे अस्तित्वात आणणे आवश्यक असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र पाटील यांनी यावेळ व्यक्त केले.
"काय होता गुन्हा माझा ? का दिलीस मला सजा ? निष्पाप जीव होता माझा, या सुंदर जगातून मलाच का केलस वजा ? "अशा काव्य पंक्तीच्या माध्यमातून तृतीय वर्षात शिक्षण घेत असणारी विद्यार्थीनी कु प्रणिता जगताप हीने मन हेलावणारे मनोगत यावेळी उपस्थितांच्या समोर व्यक्त केले.या निषेध रॅलीचे आयोजन व नियोजन एनएसएस कोऑर्डिनेटर प्रा.रुतुजा जगताप व प्रा.समृद्धी नाळे यांनी केले.
What's Your Reaction?