केंद्राने केलेल्या "त्या" कायद्या विरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे इंदापूर तहसीलसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Jan 11, 2024 - 16:47
 0  29
केंद्राने केलेल्या "त्या" कायद्या विरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे इंदापूर तहसीलसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

आय मिरर

हिट अँड रन'बाबत केंद्र सरकारनं नवे कायदे केले असून, त्याअंतर्गत ट्रक किंवा डंपर चालकाकडून अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला आणि तेथून पळून गेल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच, 7 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दि.११ जानेवारी रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषणा केले आहे.गुरुवारी सकाळपासून हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

'हिट अँड रन' म्हणजे काय?

ज्या प्रकरणांमध्ये वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो ती प्रकरणे 'हिट अँड रन' म्हणून गणली जातात. हिट अँड रन प्रकरणांमध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो. जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता.

काय आहे 'हिट अँड रन' नवीन कायदा?

केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे.

यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.

कलम 104 मध्ये हिट अँड रन कायद्याचा उल्लेख

नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 104 मध्ये हिट अँड रन कायद्याचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार, चुकीच्या पध्दतीने वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, चालकाला जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाईल. कलम 104 (A) मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचवेळी, कलम 104B मध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की, जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर, चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.

केवळ ट्रकचालकच नाही तर बस, टॅक्सी, ऑटोचालकही याला विरोध करत आहेत. नवीन नियम खाजगी वाहन चालकांनाही लागू होतील. नवीन कायद्यातील तरतुदी खूप कडक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow