इंदापूरच्या निमगावात ऐन पाडव्या दिवशी दुध दरावरुन शेतकरी संतप्त, केलं दुध दर गुण नियंत्रण समितीचं प्रतिकात्मक दहन
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मध्ये निमगाव केतकीत ऐन दीपावलीच्या पाडव्या दिवशी दुध दर गुण नियंत्रण व पशुखाद्य गुणवत्ता व दर नियंत्रण समितीचं प्रतिकात्मक दहन करीत राज्य सरकारने भांडवलदारांना पाठीशी घातल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय.गाई च्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी यावेळी दुध उत्पादकांनी केलीय.
याचसोबत दुधाला दर मिळालाच पाहिजे, भांडवलदारांची दिवाळी आणि शेतक-यांचा शिमगा,दुध दर गुण नियंत्रण व पशुखाद्य गुणवत्ता दर नियंत्रण समितीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्यात.
मागील काही दिवसापासून दुधाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे चाळीस रुपये प्रति लिटर दुधाचा द्यावा अशी मागणी राज्यातील दुध उत्पादकांकडून केली जात आहे. दुग्धविकास खात्याने चौतीस रुपये प्रति लिटरच्या खाली दुधाचे येऊ देणार नसल्याचे सांगितले होते परंतु सरकारच्या लवचिक भूमिकेमुळे आज दूध उत्पादकाचे मोठ्या प्रमाणात भांडवलदार शोषण करत असल्याची टीका उपस्थित दुध उत्पादकांनी केली.
शेतकऱ्याकडून कमी किमतीला दूध घेऊन ग्राहकांना चढ्या किमतीमध्ये विकून ग्राहकाचे देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. पशुखाद्याचे देखील दर कमी करू असे सांगितले होते परंतु त्याचे देखील दर वाढत आहेत.यामध्ये राज्य सरकारच्या दुग्धविकास मंत्र्यांनी स्थापन केलेली दूध दर गुणवत्ता नियंत्रण समिती , याचबरोबर पशुखाद्य गुण नियंत्रण समिती यांचा कारभार देखील संशयास्पद असून ते देखील भांडवलशाहीच्या हितासाठी निर्णय घेतात अशी शंका उपस्थित दुध उत्पादकांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?