मोठी बातमी | बारामतीतील विमानतळाचा ताबा आता एमआयडीसी कडे,रिलायन्स समूहाचा करार रद्द !

आय मिरर
रिलायन्स समूहाचा करार रद्द करत बारामतीतील विमानतळाचा ताबा आता एमआयडीसी ने स्वतःकडे घेतला आहे. मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीला औद्योगिक विकास महामंडळाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे भूखंड वाटप केला होता. त्यामुळे आतापर्यंत बारामती विमानतळाचा ताबा हा रिलायन्स समूहाकडे होता.मात्र महामंडळाच्या भाडेपट्टा करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याचे निदर्शनास आल्याने वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द करीत महामंडळाने आज आठ एप्रिल रोजी या भूखंडाचा ताबा काढून घेतला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे.
भाडेपट्टा करारनाम्याने वाटप केलेल्या भूखंडाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग केल्याने मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हा भूखंड परत ताब्यात घेतला आहे.
मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांना महामंडळाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे भूखंड वाटप केला होता. महामंडळाच्या भाडेपट्टा करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द करण्याबाबत टर्मिनेशन नोटीस महामंडळाकडून १६ जानेवारी २०२५ अन्वये बजावण्यात आलेली होती. त्यानुसार दि.८ एप्रिल रोजी या भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा परत घेतलेला आहे.
What's Your Reaction?






