मोठी बातमी ! कर्मयोगी यंदा तेजीत चालणार शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात

Sep 1, 2023 - 16:21
Sep 1, 2023 - 16:45
 0  3538
मोठी बातमी ! कर्मयोगी यंदा तेजीत चालणार शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस बिले अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे गेली काही महिने शेतकऱ्यांची ऊस बिल कारखान्याकडे थकली होती.केंद्र सरकारने एनसीडीसी मार्फत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला दिलेलं 150 कोटी रुपयाचे दिलेले कर्ज आज दुपारीचं कारखान्याच्या खात्यात जमा होताच शेतकऱ्यांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यास सुरुवात झाली आहे शिवाय कारखान्यातील कामगारांची थकलेले पगार देखील त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे आगामी हंगामात कर्मयोगी साखर कारखाना पुन्हा एकदा तेजीत चालणार आहे.

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे धुराडं आणि शेतकऱ्यांच्या चुलीचा निघणारा धुर याची एक नाळ आहे. कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांनी बिजवडीच्या माळावर त्या काळात उभा केलेला हा कारखाना आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं केंद्र बनला आहे. या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळालेच शिवाय याच कारखान्याच्या जोरावर उजनी पट्ट्यातील शेतकऱ्यांची प्रगती देखील झालीय. मात्र गेल्या काही वर्षांपासून या कारखान्याने सतत आर्थिक संकटांचा सामना केला. आता मात्र केंद्र सरकारकडून एनसीडीसीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच कर्ज कारखान्याला उपलब्ध झाल्याने आगामी काळातील गाळपाचा मार्ग सोपा होत आर्थिक संकटांची सोडवणूक यातून झाली आहे.

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारने एनसीडीसी मार्फत कर्ज दिले आहे.भाजपा नेते मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कर्जाबाबत सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून कर्ज कारखान्याच्या खात्यात जमा होताच कारखान्याच्या प्रशासकीय विभागाकडून शेतकऱ्यांची कारखान्याकडे थकलेली ऊस बिले तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

कर्मयोगी सहकारी साखर कारखाना गेली काही वर्ष अडचणीतून जातोय. मात्र आजपर्यंतच्या प्रत्येक गाळप हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले कारखान्याने पुर्ण दिली आहेत. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही शेतकऱ्याचे ऊस बिल बुडवले नाही हा इतिहास आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाची बिले देण्यास कारखान्यास अडचणींचा सामना करावा लागला. हीच दबती नस ओळखत विरोधकांनी हर्षवर्धन पाटील यांना अनेक वेळा टार्गेट ही केलं.

आता केंद्र सरकारने एनसीडीसी मार्फत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या करिता महत्त्वाच्या असणाऱ्या या साखर कारखान्यास 150 कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे त्यामुळे कारखाना पुन्हा एकदा कात टाकून जोमाने सुरुवात करणार आहे. आगामी गाळप हंगाम तोंडावर आला असताना कारखान्यास कर्ज प्राप्त झाल्याने येणाऱ्या हंगामात  चांगला दर मिळू शकतो आणि वेळेत ऊस बिले अदा करण्यात अडचणी येणार नाहीत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow