अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राजवर्धन पाटील,भिगवण नजीक अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारास उडवलं

Nov 14, 2023 - 14:00
Nov 14, 2023 - 15:53
 0  877
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राजवर्धन पाटील,भिगवण नजीक अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारास उडवलं

आय मिरर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धकड देऊन अपघात केलाय.दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी जखमीला तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत त्याचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली आहे.

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील हे यावेळी येथून प्रवास करीत होते.त्यांनी अपघातग्रस्त नागरिकाला पाहताच गाडी थांबवून त्यांची चौकशी केली त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.      

युवा नेतृत्व राजवर्धन पाटील आपल्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. आज देखील अपघातग्रस्त नागरिकाला योग्य ती मदत व सहकार्य केले.आपल्या सुरक्षित प्रवासाची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow