क्रिकेट वरून झालेल्या वादात पुण्यात गोळीबार ! आठवडाभरातील तिसरी घटना ; अरे पुण्यात चाललाय तरी काय ?

Mar 21, 2024 - 14:18
 0  1921
क्रिकेट वरून झालेल्या वादात पुण्यात गोळीबार ! आठवडाभरातील तिसरी घटना ; अरे पुण्यात चाललाय तरी काय ?

आय मिरर

पुण्यातून गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आला आहे. क्रिकेट खेळण्यावरून 2 गटात भांडण झालं होतं. यानंतर ही गोळीबाराची घटना घडली.

ही धक्कादायक घटना पुण्याच्या कात्रज परिसरातून समोर आली आहे. सुदैवानं गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज भागात राहत असलेल्या 2 गटात क्रिकेटची मॅच मंगळवारी पार पडली. या गटात क्रिकेट खेळण्यावरून वाद झाले आणि हा वाद मिटवण्यासाठी या दोन्ही गटातील तरुण बुधवारी भेटले. यावेळी एका गटात एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा वाद झाले.

इंदापूरमधील गोळीबाराची घटना - 

काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंदापूरमध्ये हॉटेलमध्ये गोळ्या झाडून एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून आळंदी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये अविनाश धनवे याच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. डोक्यात गोळ्या झाडल्याने अविनाशचा जागीच मृत्यू झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी २४ तासांच्या आत अविनाश धनवे याचा खून करणाऱ्या आरोपींना अटक केली. अविनाश धनवे खून प्रकरणी त्यांची पत्नी पूजा धनवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी गटातील एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. मात्र ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली. यावेळी 2 तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow