त्याचे हात बांधलेले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला ? अक्षय शिंदे एन्काऊंटर वर सुप्रिया सुळेंचा सवाल
आय मिरर
बदलापूर येथील घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्याचे दोन्ही हात बांधले आहेत तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला ? हा देश संविधानाने चालतो काल जी घटना झाली त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुळेंनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावं गृहमंत्री यांनी ऊत्तर द्यावे.आज राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत.आमची मागणी फाशीची होती,एखाद्या पोलिसांवर हल्ला होतो, ही यंत्रणा करते काय असा सवाल ही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली. त्यानंतर २० ऑगस्टला या प्रकरणाच्या विरोधात बदलापूरमध्ये मोठा बंद पाहण्यास मिळाला. बदलापूर बंदमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. बदलापूरकरांनी ९ तास रेल्वे रोकोही केला होता. या घटनेनंतर अक्षय शिंदेला फाशी द्या ही मागणीही जोर धरु लागली होती. आता अक्षय शिंदेचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
तळोजा तुरुंगातून अक्षय शिंदेला आणलं जात होतं. तेव्हा एपीआय मोरे यांची बंदुक अक्षय शिंदेने खेचली आणि गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात लोडेड बंदुक होती त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी अक्षय शिंदेला गोळ्या लागल्या. अक्षय शिंदे ला आणि जखमी पोलिसांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
What's Your Reaction?