Breaking News : पळसदेव नंतर इंदापुरात पुन्हा पिकली खसखस ! पोलिसांना लागली खबर अन् ....

देवा राखुंडे : आय मिरर
इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात खसखसची म्हणजेच अफूची शेती करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने आपल्या शेतामध्ये ही लागवडीस बंदी असलेली खसखस म्हणजेच अफू लावलेली होती.गोपनीय बातमीदारांपतमार्फत याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर वालचंद नगर पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने संयुक्तिक ही कारवाई केली आहे.
न्हावी गावाचे शिवारात मक्याच्या पिकात ही अफूची शेती केली होती. पोलिसांनी कारवाई करत एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. रतन कुंडलिक मारकड, बाळू बाबुराव जाधव आणि कल्याण बाबुराव जाधव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.या तिघां विरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम नुसार गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत तिप्पट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.
यापूर्वी देखील इंदापूर तालुक्यातील पळसदेव भागात मार्च 2023 मध्ये अशा पद्धतीने अफूची शेती करण्यात आली होती. पोलिसांनी या कारवाई 1 कोटी 41 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता.आता पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील न्हावी परिसरात या पद्धतीच्या शेतीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
असा होता प्लॅनिंग...
रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव यांनी त्यांचे मालकीचे शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड विक्री करणेच्या उद्देशाने करून उत्पादन घेतले आहे, अशी बातमी पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली. यानंतर पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वालचंदनगर पोलिसांनी न्हावी गाठले.
पोलिसांना शेतामध्ये अफूची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले.अफूची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चहु बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते.
कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफूची झाडे हस्तगत करणेत आलेली असून या तिघां विरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम नुसार गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचे मार्गर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पो स्टे च्या पो. नि. वैशाली पाटील, वालचंदनगर पो. स्टे. चे स.पो.नि. राजकुमार डुणगे,स्था.गु.शा.चे स.पो.नि. कुलदीप संकपाळ, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडू विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेच खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, बिभीषण सस्तुरे, वालचंदनगर पो स्टे कडील पो.स.ई. विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर बारामती तालुका पो स्टे चे महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?






