रेल्वे लाइनचं काम करुन ते घरी परतत होते, वाटेत गाडीला भीषण अपघात झाला अन् तिघांचा जीव गेला

Mar 20, 2024 - 14:57
Mar 20, 2024 - 14:58
 0  542
रेल्वे लाइनचं काम करुन ते घरी परतत होते, वाटेत गाडीला भीषण अपघात झाला अन् तिघांचा जीव गेला

आय मिरर

रेल्वे लाइनचे काम करून घराकडे परतणाऱ्या मजुरांच्या डंपर आणि समोरुन येणाऱ्या पीकअप यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात रात्री अकराच्या सुमारास हिरापूर (ता.चाळीसगाव) गावाजवळ घडला.

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचे काम सध्या सुरू आहे. या लाईनवर तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे जात असताना चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडी व डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की डंपर जागेवरच उलटला. यात डंपरमधील काही मजूर फेकले गेले, तर काही डंपरखाली दाबले गेले.

अपघातात एका महिलेसह एक जागीच ठार झाले होते. तर अन्य मजूर जखमी झाले. तसेच एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी धावले. नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow