संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली,बावड्यातील टोल वसुलीला नागरिकांचा तीव्र विरोध

आय मिरर
इंदापूर ते अकलूज दरम्यान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण होण्याअगोदरच सराटी या ठिकाणी टोल वसुली सुरू करण्यात आली आहे.या टोल वसुलीला बावडा ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय.रस्त्याचं काम अपूर्ण असताना ही केली जाणारी सक्तीची टोल वसुली तातडीने थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केलीये.
इंदापूर अकलूज रोडवर बावडा ग्रामपंचायत हद्दी मध्ये विना परवाना टोलनाका बांधकाम केले आहे. तरी सदर बांधकामा बाबत दोन दिवसात टोल व्यवस्थापनाकडून ग्रामपंचायतने खुलासा देखील मागवलेला आहे.
अगोदर रस्ता पूर्ण करा, मग टोल वसुली करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.सदरचा टोलनाका दि.06 मे रोजी पासून चालू करण्यात आला आहे. परंतु या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे रस्त्यावरील काम अपूर्ण आहे व इतर अनेक समस्या आहेत. या संदर्भातील लेखी निवेदन टोल प्रशासना सह भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास देण्यात आलं आहे. या निवेदनावर 250 हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
काय आहेत मागण्या?
१) स्थानिक बावडा गावातील नागरिकांना पूर्ण टोल माफी करण्यात यावी.
२) बावडा गावापासून टोलनाका हा केवळ २ ते ३ किलोमीटर इतकाच आहे त्यामुळे बावडा ग्रामस्थांसोबत होणारी टोल सक्तीची मनमानी अन्यायकारक असून ती खपवून घेतली जाणार नाही.
३) बावडा गावातील व परिसरातील नागरिकांना टोल वरती नोकरीत प्राधान्य देण्यात यावे.
४) इंदापूर ते सराटी पालखी महामार्गचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून २५ ते ३०% अपूर्ण असताना टोल वसुली कोणत्या आधारावर चालू केला.
५) इंदापूर ते सराटी पालखी महामार्ग रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून कामाचा दर्जा तपासून सबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
६) टोल नाक्यावरती सर्व नियमावली टोल परिसरात मोठ्या अक्षरात प्रसिद्ध करण्यात यावी.
What's Your Reaction?






