मोठी बातमी | माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः अजित पवार उतरले मैदानात,या मतदारसंघातून दाखल केली उमेदवारी

May 27, 2025 - 21:32
 0  179
मोठी बातमी | माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः अजित पवार उतरले मैदानात,या मतदारसंघातून दाखल केली उमेदवारी

आय मिरर 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आजच्या या शेवटच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे.बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत.

अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रेय येळे, तर अनुमोदक म्हणून सुनिल पवार यांच्या सह्या आहेत. दत्तात्रेय येळे यांनीच अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने, गणेश शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

माळेगाव - माळेगाव कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकूण ५९३ उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले आहेत.

विशेषतः या उमेदवारी यादीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्ग संस्था मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केल्याचे स्पष्ट झाले. पवार हे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलमध्ये सहभागी होतात का? हा खरा उत्सूकतेचा विषय झाला आहे. तसे झाल्यास पक्षाच्या पॅनेलला खूपच वजन प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्रेष्टींनी आज आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले. त्यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे,सतिश तावरे, पणदरे गटामधून केशवराव जगताप आणि राजेंद्र जगताप,तर सांगवी गटातून अनिल तावरे, प्रकाश तावरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.यासोबत खंडच गटामधून रामदास आटोळे, तर बारामतीतून पोपटराव गावडे आदींचा समावेश आहे.

या उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी बाळासाहेब तावरे यांनी सुमारे २८ वर्षे कारखान्याच्या संचालकपदावर काम केले, तर अध्यक्षपदावर ते जवळपास १७ वर्षे कार्यरत राहील्याची नोंद आहे.केशवराव जगताप हे दोन वर्षापासून अध्यक्षपदावर काम करीत आहेत, तर त्यांना संचालक पदाचा १७ वर्षांचा अनुभव आहे. राजेंद्र जगताप यांना माळेगाव कारखान्यात अधिकारी म्हणून ३६ वर्षे काम केल्याचा अनुभव आहे.

चंदाराव तावरे 45 वर्षापासून तर रंजन तावरे तीस वर्षापासून सक्रिय...

राजकिय स्थितीचा विचार करता विरोधी गटाचे प्रमुख व उमेदवार चंद्रराव तावरे हे ४५ वर्षांपासून म्हणजेच सन 1980 पासून माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत. तसेच रजंन तावरे हे देखील जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow