डिकसळच्या उपसरपंचपदी जयश्री सवाने बिनविरोध

Oct 12, 2023 - 15:05
Oct 12, 2023 - 15:11
 0  911
डिकसळच्या उपसरपंचपदी जयश्री सवाने बिनविरोध

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील डिकसळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जयश्री महेंद्र सवाने यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक प्रतिभा देवकाते यांनी जाहीर केले. गेल्या वर्षी डिकसळ ग्रामपंचायतची पंच वार्षिक निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत सरपंचपदी सर्व गावातून मनीषा संदीप गवळी निवडून आल्या होत्या. तर उपसरपंचपदी संदीप साधू भोंग हे विराजमान झाले होते.

आपला ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपसरपंच संदीप भोंग यांनी राजीनामा दिला होता.रिक्त झालेल्या जागेसाठी आज गुरुवार दिनांक 12 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी सरपंच मनीषा गवळी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत उपसरपंचपदी जयश्री महेंद्र सवाने यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक प्रतिभा देवकाते यांनी सर्वांमते जयश्री सवाने यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सवाने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नूतन उपसरपंच जयश्री सवाने यांनी सांगितले की सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow