कुटुंबाच्या सुखी व आनंदासाठी योग प्राणायामास अधिक महत्व - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
आय मिरर
पतंजली योग परिवार इंदापूर व महिला पतंजली योग समिती यांच्या विद्यमाने येथील शहा कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या मोफत योग प्राणायाम शिबिराच्या 19 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील सहभागी होवून योग प्राणायम केला. यावेळी बोलताना त्यांनी देश, समाज व आपल्या कुटुंबाच्या सुखी व आनंदासाठी योग प्राणायामास अधिक महत्व असल्याचे सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,' 2 ,3 व्यक्तींना बरोबर घेऊन सुरू केलेला योग वर्ग आज या योग वर्गासाठी जागा पुरत नाहीत. आरंभ शेवटपर्यंत टिकवणे अवघड असते परंतु पतंजली योग परिवाराने हे व्रत अखंडितपणे सुरू ठेवून सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. यासाठी सर्व योगगुरूंचे मी अभिनंदन करतो. जो व्यक्ती योग करतो तो आपल्या जीवनात अधिक फायद्याचे काम करतो असे मी मानतो.
संपत्तीपेक्षा आरोग्य महत्त्वाचे असून योग करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आनंदी असतो. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यापासून या तालुक्याला राजकीय , सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक संस्कार लाभले आहेत. इंदापूर शहरामध्ये 2.5 कोटी रुपयाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे योग भवन उभारण्याचे काम सुरू आहे. यावेळी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते.
What's Your Reaction?