आता इंदापूरात लावाव्या लागणार मराठी पाट्या,पाट्या लावा नाहीतर गुन्हे दाखल करा - मनसेची मागणी 

Dec 5, 2023 - 15:06
Dec 5, 2023 - 17:19
 0  357
आता इंदापूरात लावाव्या लागणार मराठी पाट्या,पाट्या लावा नाहीतर गुन्हे दाखल करा - मनसेची मागणी 

आय मिरर

दुकाने संस्था अस्थापनावरील इंग्रजी पाट्यांच्या मुद्दयावरुन पुण्याच्या इंदापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होताना दिसत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इंदापूर तालुका हद्दीतील दुकाने, संस्था, अस्थापनावरील पाट्या मराठीत लावण्याबाबतच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच मराठीत पाट्या न लावणा-या दुकानावर, संस्थेवर, अस्थापनावर खटले दाखल करण्यात यावेत अशी मागणीच लेखी निवेदनाव्दारे इंदापूर तहसीलदारांकडे केली आहे.

मंगळवार दि.०५ रोजी इंदापूर तहसील कार्यालय आणि इंदापूर पंचायत समितीला हे निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष संतोष भिसे,जिल्हा सचिव राम काळे,उपाध्यक्ष राजेंद्र हजारे,निमगांवचे शहराध्यक्ष कल्पेश यादव,उपाध्यक्ष ओंकार शेंडे,प्रशांत पवार यांच्या सद्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व दुकाने, संस्था अस्थापनावर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ची मुदत दिली होती परंतु बहुतांशी दुकानदाराने मराठी पाट्या लावण्याकरीता सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

इंग्रजी नावे ज्या आकारात केली त्याच आकारात मराठी अक्षरे करण्यात यावीत त्यामुळे प्रशासननाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात करावी.

तहसील प्रशासनाने इंदापूर तालुका हद्दीतील सर्व दुकाने, संस्था, अस्थापना यांची तपासणी करावी शिवाय कारवाई करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती करावी, तसेच मराठीत पाट्या न लावणाऱ्या दुकानावर खटले दाखल करण्यात यावेत.अशी मागणी मनसेकडून करण्यात आलीय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow