इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असून ते आज शनिवारी दि.२१ आँक्टोंबर रोजी इंदापूर येथील सभा करून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे जात असताना त्यांचे भिगवण येथे मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करून एक मराठा लाख मराठा,मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणदणून सोडला.
यावेळे मनोज जरागे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय मी मागे हटणार नाही.आरक्षणाचा मुद्दा अतिशय जवळ आलेला आहे, २४ आँक्टोंबर पर्यंत वाट पाहू, शासन निर्णय घेईल असे वाटते. परंतु लढायची वेळ आल्यास समाजाने सज्ज रहा असे आवाहन त्यांनी केले.
मी आरक्षण तुम्हाला मिळवून देणारच, त्याशिवाय थांबणार नाही. तरुणांनी आत्महत्या सारखे विचार मनात आणू नयेत. संपूर्ण महाराष्ट्रातील समाज आता जागा झालेला आहे. मला अजून बरेच पुढील कार्यक्रम आहेत, भिगवण साठी मी नंतर वेळ देईल. आंदोलन करण्याची वेळ आल्यास सर्वांनी शांततेच्या मार्गाने,आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनेच आंदोलन करावे करावे असेही जरांगे पाटील म्हणाले.
What's Your Reaction?