ते अगोदर लिफ्ट द्यायचे मग,दमदाटी करुन महिला प्रवाशांचे दागिणे लुटायचे ! भिगवण पोलिसांनी समदचं बाहेर काढलं

Dec 27, 2024 - 20:07
 0  1580
ते अगोदर लिफ्ट द्यायचे मग,दमदाटी करुन महिला प्रवाशांचे दागिणे लुटायचे ! भिगवण पोलिसांनी समदचं बाहेर काढलं

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण व भिगवण परिसरात लिफ्ट देण्याच्या बहाणा करून लुटणाऱ्या टोळीला भिगवण पोलिसांनी मोठ्या क्षिताफिने पकडले आहे.या टोळीकडून५४ हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून भिगवण पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार डिसेंबर महिन्यातील शनिवारी (दि.०७) रोजी दुपारी १२:०० वा ते १२:३० वा.चे दरम्यान मौजे भिगवण गावचे हद्दीत सागर हॉटेल समोर सोलापुर पुणे रोडवर फिर्यादी लीलाबाई पोपट मोघे, (रा.राजेगाव, ता. दौंड, जि.पुणे) ह्या व त्यांची ननंद शकुंतला किसन फासगे रावणगाव येथे जाण्यासाठी थांबलेल्या होत्या.

दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडी मधुन एक पुरूष व दोन महीला यांनी त्यांना लिफ्ट दिली.त्यांना गाडीमध्ये बसवुन भिगवण गावापासून थोडे पुढे गेले.त्यानंतर फिर्यादी यांचे गळ्यातील दीड तोळे वजनाचे 54 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र जबदस्तीने काढुन घेतले.या दोघी महिला प्रवाशांना गाडीतुन खाली उतरवत तिथून पोबारा केला. 

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचे असल्याने व महिलांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे, यांनी गुन्ह्याचे तपासी अंमलदार प्रविण जर्दे, यांना मार्गदर्शन करून गुन्ह्याचा सखोल तपास करणेबाबत आदेश दिला होता.

त्याप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास चालु असताना अशाच प्रकारचा इंदापुर पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हा घडलेला असल्यामुळे इंदापुर पोलीस स्टेशनचे गुन्ह्यातील आरोपी १) संभाजी शिवाजी भोसले, २) महानंदा भद्री पवार उर्फ महानंदा लीला पवार, ३) ममता संभाजी भोसले, (सर्व रा. बिसमिल्लानगर, मुळेगाव रोड, उत्तर सोलापुर) यांना सदर गुन्ह्यात वर्ग करून घेवुन त्यांचेकडे दाखल गुन्ह्याचा सखोल तपास केला असता आरोपी यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसुत्र त्यांच्याकडून परत घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी सहा.पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे हे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow